विटा येथे श्री सदगुरु नागरी सहकारी पतसंस्थेचे उदघाटन आ. सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. बाबर बोलत होते, कि विटा शहर हे बँकिंग व्यवसायास धार्जिणे आहे. अनेक संस्था चांगल्या चालतात. चेअरमन अॅड. धर्मेशभैय्या पाटील यांची नव्याने बँकिंग क्षेत्रातील वाटचाल पाहता या संस्थेला खूप मोठे भवितव्य आहे. त्यामुळे श्री सद्गुरु नागरी सहकारी पतसंस्था आगामी काळात बँकिंग क्षेत्रात उत्तम प्रगती साधेल. सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देवून पतवान बनवावे.
आ. सुहास बाबर म्हणाले, आताच्या काळामध्ये पतसंस्था सुरू करणे खूप सोप आहे. पण ती चालवणं खूप मोठ जिकीरीचं काम आहे. कदम कुटुंबियांनी पतसंस्था सुरू करण्यात घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. श्री सदगुरु पतसंस्था चांगल्या पद्धतीने चालेल. आर्थिक संस्था सांभाळण्यासाठी जबाबदारी घेणारी माणसं असावी लागतात. सर्वसामान्य आणि शेतकरी वाढवण्यासाठी या पतसंस्थेने काम करावे. पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याबाबत वर्गाची पत शासनाला लवकरच भूमिका घ्यायला लावू.
डॉ. प्रताप पाटील म्हणाले, कदम कुटुंबियांनी ही पतसंस्था विचारपूर्वक सुरू केलेली आहे. ग्राहकांना बँकिंग क्षेत्रात चांगली बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न होईल. पतसंस्थेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करणे सोप आहे. पण ती बँक सक्षमपणे चालवणे खूप कठीण आहे. सोने तारणवर कर्ज देण्याचा संस्थेने घेतलेला निर्णय चांगला आहे.
