हातकणंगले तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत

हातकणंगले तालुक्यातील एकूण ६१ ग्रामपंचायतसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रीया व सर्वसाधारण स्त्रीयांची पदे यासाठी आरक्षण निश्चीत करणेसाठी मंगळवार दि.८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता हातकणंगले येथील नवीन प्रशासकीय भवन येथे सोडत पध्दतीने जाहीर करणेसाठी सोडत प्रक्रीया पार पडणार आहे.

याकरीता सर्व नागरिकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या उपस्थित आरक्षण सोडत होणार आहे. तरी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या आरक्षण सोडतीची तयारी पुर्ण झाली आहे.