दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पंढरपूरला श्री विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत असतात. त्या तुलनेत पंढरपूर आगारात बसची संख्या कमी होती, त्यात काही बस जुन्या झाल्यामुळे त्या वारंवार बंद पडत आहेत.उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोजरी, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील, वरिष्ठ आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काही बस स्क्रॅप करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे एसटी प्रशासनास बसच्या वेळा आणि संचलनाचे नियोजन करताना चांगलीच तारेवरची कसरत होते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पंढरपूर एसटीच्या ताफ्यात नवीन ५ बस दाखल झाल्या आहेत, तर पुढील काळात आणखीन ५ बस (लालपरी) दाखल होणार असल्याचे आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत यांनी सांगितले.