छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हेरिटेज टूर

लवकरच महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ (Chhatrapati Shivaji Maharaj) ही रेल्वे टूर सुरू करण्यात येत आहे. आयआरटीसीकडून भारत गौरव ट्रेनअंतर्गंत ही टूर सुरू होणार आहे. या टूरच्या माध्यमातून तुम्ही महाराजांचे गडकिल्ले, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकणार आहेत. आयआरसीटीसीने पाच दिवसांच्या टूरची घोषणा केली आहे. 9 जून 2025 पासून ही टूर भारत गौरव पर्यटक ट्रेनअंतर्गंत आयोजित करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत प्रमुख ऐतिहासिक आणि अध्यात्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. या टूरची किंमत किती आणि कोणती स्थळे पाहता येणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ (Chhatrapati Shivaji Maharaj) ही टूर मुंबईतील सीएसएमटी येथून सुरू होईल आणि तिथूनच या टूरची सांगता होणार आहे. मात्र प्रवासी दादर, ठाणे येथेही बोर्डिंग करु शकणार आहात. आयआरटीसीकडून या टूरची सविस्तर माहिती समोर आली आहे.

या स्थळांना भेट देऊ शकणार

रायगड किल्ला : स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक स्थळ

पुण्यातील लाल महाल आणि कसबा गणपती : छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या किल्ल्यात गेले. तर, कसबा गणपती हे पुण्याचे प्रमुख देवता ग्रामदेवता आहे.

शिवनेरी किल्ला : शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला

प्रतापगड किल्ला : सातारा जिल्ह्यात हा किल्ला असून येथेच शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला

पन्हाळा किल्ला : हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे.

कोल्हापूरातील : महालक्ष्मी मंदिराचादेखील या टूर पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या टूरमध्ये तीर्थक्षेत्रांचाही समावेश .

भीमाशंकर येथे भगवान शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

टूरची किंमत किती ?

ही टूर तीन श्रेणींमध्ये असणार आहे.

इकोनॉमी (स्लीपर क्लास): 13,155 रुपये
कम्फर्ट (3AC): 19,840 रुपये
सुपीरियर (2AC): 27,365 रुपये