‘एमपीएससी’ची सर्वात मोठी भरती !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मेगाभरती जाहीर केलेली आहे. या भरतीमधून तब्बल २ हजार ७९५ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये एकूण २ हजार ७९५ पदांपैकी ११२ पदे दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

. क्र.तपशिल  विहित कालावधी
अर्ज सादर करावयाचा कालावधी  २९ एप्रिल, २०२५ रोजी १४.०० ते १९ मे, २०२५ रोजी २३.५९
ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक१९ मे, २०२५ रोजी २३.५९
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक२१ मे, २०२५ रोजी २३.५९
चलनाद्वारे परीक्षाशुल्क भण्याचा अंतिम दिनांक  २२ मे, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

वेतनश्रेणी:-

स्तर एस-२० रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

शैक्षणिक अर्हताः-

१. शैक्षणिक अर्हताः- Possess Bachelor’s Degree in Veternary Science or Veterinary Science and Animal Husbandry. (भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, १९८४ च्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय अर्हता.)

शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा दिनांक:-

  • प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • राज्य पशुवैद्यक परिषद / भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा, १९८४ नुसार नोंदणी असणे आवश्यक असून नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे अनिवार्य
    आहे.

MPSC Animal Husbandry Bharti 2025 application process: अर्ज करण्याची पध्दत :-
अर्ज सादर करण्याचे टप्पे :-
१. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करणे.
२. खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे,
३. विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
४. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.

Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group A – Advertisement link https://mpsc.gov.in/adv_notification/8

पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ अर्जाची लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login

MPSC Animal Husbandry Service Recruitment 2025: महत्त्वाच्या सूचना –
. भरावयाच्या उपरोक्त संवर्ग / पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे. तसेच, वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.

. शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती / बदल वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

. विविध मागास प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार राहील.

. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, समाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आणि इतर मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटात मोडत नाहीत, असे अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणे व त्याबाबतचे सक्षम प्रधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

. शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक-महिआ २०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२. दिनांक ०४ मे, २०२३ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार अराखीव महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.

. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणा-या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील.

. महिलांसाठी आरक्षित पदांकरीता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन-क्रीमीलेअरमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.
प्रमोद सरवळे
लेखकाबद्दल