शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून करणे संबंधित शाळांवर बंधनकारक आहे. विद्यार्थ्याच्या पाचवी ते दहावीतील
विद्याथ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहता याव्यात व त्याची माहिती मिळावी म्हणून दरवर्षी सहलीला मान्यता देण्यात आली.
पण सहलीसाठी विद्याथ्र्यांना सक्ती नको आणि सहलीसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती बंधनकारक असेल असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सहली पूर्वी आपत्कालीन परिस्थितीत काय करावे यासंबंधीचे प्रशिक्षण द्यायलाच हवे असे शासनाच्या आदेशात नमूद केले आहे.
सहलीवेळी शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सहलीचे आयोजन केल्यानंतर एसटी महामंडळाची बस भाड्याने घ्यावी.
सहलीदरम्यान विद्याथ्यांची हेळसांड किंवा कुचंबना झाल्याची तक्रार पालकांनी केल्यास संबंधित शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्याचेही प्रयोजन आहे. सहलीत मुलींचा सहभाग असल्यास त्याप्रमाणात शिक्षिका देखील असाव्यात, असे शिक्षणाधिकार्यानी स्पष्ट केले आहे.
मात्र, यातील बऱ्याच नियमांना फाटा देऊन सहलींचे आयोजन केले जाते ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून प्रवास भाड्या पन्नास टक्के सवलत दिली जाते. संबंधित शाळांनी त्यासाठी प्रत्येक डेपो किंवा आगारात जाऊन प्रस्ताव सादर केल्यास त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध करून दिली जाते.
शैक्षणिक सहलीसाठी अटी व शर्ती काही अशा आहेत. समुद्रकिनारी उंच पर्वतावर, नदी, तलाव अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रतिबंध सहली पूर्वी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थिती संदर्भात प्रशिक्षण देणे. सहलीपूर्वी पालकांची संमती व नियोजनाची माहिती पालकांना द्यावी.
सहलीला फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसचा वापर करावा. सहलीसाठी दहा विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असावा. शैक्षणिक सहलीवेळी तंबाखू गुटखा किंवा मादक पदार्थांचे सेवन नको, सहलीतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांची त्यासंबंधीचे स्टॅम्पवर हमीपत्र द्यावे. रेल्वे क्रॉसिंग वरून बस ओलांडताना सावधगिरी बाळगावी रात्रीचा प्रवास टाळावा. विद्यार्थ्यांचा विमा काढणे वैद्यकीय तपासणी रक्तगट तपासणी करूनच घ्यावी.