सोलापुरात गुरुवारी चंदुकाका सराफ ज्वेलर्सचा शुभारंभ!

चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. ही १९७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली सुवर्णपेढी आता श्री शिवयोगी सिध्देश्वरांच्या पावन नगरीत सुरू होत आहे. चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स प्रा. लि. यांच्या सोलापूर शाखेचा शुभारंभ गुरूवार दि. १८ जानेवारी रोजी होत आहे. गुरूवारी सकाळी १०.३० वा. सोलापूर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांच्या हस्ते व आ. विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, कु. प्रणिती शिंदे, सचिन कल्याण- शेट्टी, नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स प्रा. लि. चे चेअरमन किशोरकुमार जिनदत्त शहा, संचालक सम्यक शहा व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.


शुभारंभानिमित्त दि. १८ ते २१ जानेवारी या कालावधीत शुभारंभ ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये १ महिंद्रा एक्सयूव्ही व १२ ज्युपिटर बाईक अशी १३ बक्षीसे जिंकण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे. उद्घटन कार्यक्रमाला व त्या निमित्ताने आयोजित केलेल्या अनेक आकर्षक योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन किशोरकुमार शहा व सम्यक शहा यांनी केले आहे.