आपल्या उज्ज्वल भविष्याचा निर्णय घेण्यासाठी ज्या निकालाची उत्सुकता असते अशा बारावीच्या परीक्षेचा निकाल (result) अवघ्या काही तासांत जाहीर होणार आहे. राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. ११ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान विद्यार्थांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना आज निकालाच्या स्वरूपात मिळणार आहे. दरवर्षी मुली बारावीत अव्वलस्थान पटकावतात. यंदा मुली हा रेकॉर्ड कायम ठेवणार की मुलं पहिल्या क्रमांकावर आपला ठसा उमटवणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील उपलब्ध होईल तर उद्यापासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.
बारावीचा निकाल आज जाहीर होणार
