विकी कौशल (Vicky Kaushal) हा बॉलिवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याने या इंडस्ट्रीत कोणत्याही गॉडफादरशिवाय आपल्या मेहनतीने स्वतःचे स्थान निर्माण केले. एक राष्ट्रीय आणि तीन फिल्मफेअर पुरस्कार विजेता विकी कौशलचाही फोर्ब्सच्या यादीत समावेश झाला आहे. विकी कौशल आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.
विकी कौशलचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर आहेत. असे असुनही त्याने कधीही वडिलांची मदत घेतली नाही. विकी कौशलने २०१५ मध्ये ‘मसान’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते. पण त्याही पूर्वी तो पहिल्यांदा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटात दिसला होता.
९ वर्षांच्या कारकिर्दीत, विकी कौशलने रोमँटिक भूमिकांपेक्षा गंभीर आणि ऑफ-बीट भूमिका अधिक साकारल्या. व्यावसायिक स्टार नसतानाही, विकी कौशलने खूप कमी वेळात स्टारडमची चव चाखली आणि तो ए-लिस्टर्सपैकी एक बनला. पण हा प्रवास सोपा नव्हता. विकी कौशलने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. एका चित्रपटासाठी त्याला तुरुंगातही जावे लागले होते.
गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातील एका सीनमध्ये विकी कौशल
चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्यापूर्वी विकी कौशल अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात एका वेश्यालयाचा सीन होता, जिथे रिचा चढ्ढाची व्यक्तिरेखा नगमा खातून आणि मनोज वाजपेयीची व्यक्तिरेखा सरदार खान यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्या सीनमध्ये विकी कौशल बॅकग्राउंडमध्ये उभा होता.
एका वेश्यालयात शूट केलेला सीन
विकी कौशलने ‘मिड डे’ला यासंबंधीचा एक मजेदार किस्सा सांगितला. त्या सीनमध्ये ज्या ज्युनियर कलाकारांची निवड झालेली त्यांनी ते वेश्यालय असल्याचे कळताच शेवटच्या क्षणी चित्रपट सोडला. केवळ एक्स्ट्रा कलाकार शिल्लक असल्याने, विकी कौशल आणि संपूर्ण दिग्दर्शन टीमला त्या सीनमध्ये बॅकग्राउंडमध्ये उभे राहावे लागले. विकीच्या मते, तो त्या सीनमध्ये ओव्हरअॅक्टिंग करताना दिसला. त्यावेळी विकी कौशल ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये अनुराग कश्यपला असिस्ट करत होता.
विकी कौशलला अटक झाली आणि त्याला तुरुंगात जावे लागले.
पण या चित्रपटादरम्यान विकी कौशलला तुरुंगातही जावे लागले, हा किस्सा अनुराग कश्यपने ‘जिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता., ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या शूटिंगदरम्यान विकी कौशलला पोलिसांनी अटक केली होती. विकी कौशल आणि त्याच्या टीमने परवानगी न घेता ‘गँग्स ऑफ वासेपूर’चे काही सीन शूट केले होते. यामध्ये बेकायदेशीर वाळू उत्खननाचा भाग देखील शूट करण्यात आला होता. यामुळे पोलिसांनी विकी कौशलला अटक केली आणि अभिनेत्याला तुरुंगात जावे लागले.