शरद पवारांचे एकनिष्ठ अन् विश्वासू नेते जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज (16 फेब्रुवारी ) वाढदिवस आहे.जयंत पाटलांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे निष्ठावंत नेते म्हणून बघितलं जात.सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत.

राजारामबापू पाटील यांच्याकडून त्यांना राजकारणाचा समृद्ध वारसा लाभला आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. राजारामबापूच्या पावलावर पाऊल ठेवत पाटील यांनी राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प राबवले आहेत.

‘शेकाप’मधून जयंत पाटलांचा राजकीय प्रवास सुरु झाला. राजकारणात पाऊल टाकल्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास त्यांचा आहे.

सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री, ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री तसेच गृहमंत्री ते 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.