वीज कोसळलेल्या Indigo विमानाच्या पायलटनं मदतीसाठी पाकिस्तानशी केला होता संपर्क; पण…

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. जिथं उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतच्या राज्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर या हवामानाचा(weather) थेट परिणाम होत असून, एका अतिशय भीषण प्रसंगाचा व्हिडीओ याचदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला. थोडक्यात संकट टळलं अथवा अनर्थ झाला असता हेत समोर आलेलं दृश्य पाहताक्षणी अनेकजण म्हणाले. हा प्रसंग होता इंडिगोच्या विमानाच्या आपात्कालीन लँडिंगचा.

मृत्यू दाखवणारा प्रवास…
दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E2142 मध्ये त्या क्षणी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली, जेव्हा अचानकच वातावरण बिघडलं, विमान वादळात सापडलं आणि वीजांच्या कडकडाटानं विमानालाही हादरा बसला. प्रवास करणाऱ्या 220 प्रवाशांनी किंकाळ्या ठोकल्या, देवाचा धावासुक्धा केला. या प्रसंगी सर्व नियंत्रण वैमानिकाच्या हाती असल्यानं प्रसंगावधान राखत त्यानं एअर ट्रॅफिक कंट्रोककडून काही वेळासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्प अर्थात एअरबेसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मागितली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या एअरबेसनं मात्र भारतीय वैमानिकाची ही विनंती धुडकावून लावली. ज्यानंतर आता नागरी उड्डयन महानिदेशालय उड्डाण क्रमांक 6E 2142 सोबत घटलेल्या या दुर्घटनेची चौकशी करत आहे. या विमानानं काही नेत्यांसह जवळपास 220 प्रवासी एकाच वेळी प्रवास करत होते.
विमानाचं उड्डाण झालं मात्र, अचानक गारपीट, पाऊस सुरू झाल्यामुळं वैमानिकानं श्रीनगरच्या विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमला ‘इमरजंन्सी’ घोषित करण्याच्या सूचना केल्या आणि बुधवारी हे विमान अतिशय सुरक्षितरित्य धावपट्टीवर लँड करण्यात आलं. अमृतसरवरून उड्डाणासमयी वैमानिकाला खराब हवामानामुळं एकाएकी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीमध्ये वैमानिकानं तातडीनं लाहोर एअर ट्रॅफिक रुमकडे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रामध्ये जाण्याची परवानगी मागितली. मात्र लाहोर एटीसीनं ही विनंती स्वीकारली नाही.

ही परवानगी न मिळाल्यानं नाईलाजानं वैमानिकाला मूळ उड्डाणपथावरच टिकून रहावं लागलं आणि परिणामी गंभीर परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला. जिथं विमानावर वीज कोसळून विमानाच्या पुढील टोकापाशी असणाऱ्या भागाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. वैमानिकानं अतिशय सावधगिरीनं इमरजंन्सी लँडिंग करत सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली आणि मोठा अनर्थ टळला.

दरम्याम पहलगाम हल्ला, त्यानंतरचं ऑपरेशन सिंदूर या सर्व परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण नात्यातील तेढ आणखी वाढली. ज्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी आणि भारतानं पाकिस्तानधील विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.