या आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला आहे. (sensex)सेन्सेक्स पुन्हा 65,000 चा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला आहे.
आजच्या व्यवहारात मिड कॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स (sensex) 267 अंकांच्या वाढीसह 65,216 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 83 अंकांच्या उसळीसह 19,393 अंकांवर बंद झाला.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
आजच्या व्यवहारात आयटी, एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. याशिवाय ऊर्जा, धातू, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्सची खरेदी झाली.
फक्त तेल आणि वायू आणि मीडिया शेअर्स घसरले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही तेजीने बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 5 शेअर्स घसरणीसह बंद झाले तर 50 शेअर्सपैकी 39 शेअर्स वाढीसह आणि 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर ‘या’ शेअर्समध्ये तेजी
पॉवर ग्रिडचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर सर्वाधिक 2.58 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे इंडसइंड बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.
याशिवाय टाटा स्टील, टीसीएस, टायटन, अॅक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, विप्रो, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि एचयूएल यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर ‘या’ शेअर्समध्ये घसरण:
जिओ फायनान्सचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 5 टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 306.89 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात 303.39 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.50 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.