आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा आगामी काळात परवलीचा शब्द बनणार आहे. कारण सध्या चॅट जीपीटी म्हणा किंवा अन्य काही अॅप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर्स, तसंच उपकरणांमध्ये होत असलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर पाहता भविष्यात तसं होईल यात काही शंका नाही. हे क्षेत्र अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनाही तसंच वाटतं, की एआय क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्स्पर्ट्सना असलेली मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळे एआय या क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी असू शकतात, हे पाहू या. एआय या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर सायन्स अर्थात विज्ञान शाखेतून बारावी होणं आणि त्यानंतर कम्प्युटर सायन्स किंवा इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी निगडित विविध क्षेत्रांत स्पेशलायझेशन करून त्यात एक्स्पर्ट होता येतं.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राशी निगडित प्रमुख कोर्सेस
मशीन लर्निंग आणि एआय या विषयांत पदव्युत्तर पदवी
फाउंडेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या विषयात पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम
फुल स्टॅक मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डीप लर्निंग या विषयात पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम
कोर्स कुठे करता येतील?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) क्षेत्राशी निगडित कोर्सेस आयआयटी कॉलेजेसमध्ये करता येतात. खरगपूर, दिल्ली, मुंबई, कानपूर, मद्रास, गुवाहाटी, रूरकी या शहरांतल्या आयआयटी कॉलेजेसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कोर्सेस आहेत. त्याशिवाय बेंगळुरूतली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नवी दिल्लीतली नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिट्स-पिलानी, बेंगळुरूतलं सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबॉटिक्स, म्हैसूरमधली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, अलाहाबादमधली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसंच हैदराबाद विद्यापीठ या संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी निगडित कोर्सेस उपलब्ध आहेत. सॅलरी पॅकेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातली पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला सुरुवातीलाच मासिक 50-60 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकतं. त्यानंतर अनुभव आणि कौशल्य यांच्या आधारे वेतन कमी-जास्त होऊ शकतं.