आता फक्त बीएडचं शिक्षण देता येणार नाही, NCTEचा सर्वात मोठा आदेश काय?

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता देशात फक्त बी.एड महाविद्यालयांचं संचलन बंद होणार आहे. एनसीटीईने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, देशातील एकल-चालित बी.एड (B.Ed) महाविद्यालये आता बहु-विषयक पदवी (डिग्री) कॉलेजेसमध्ये विलीन केली जातील. म्हणजे कोणतेही महाविद्यालय फक्त बी.एड. ची सिंगल पदवी देऊ शकणार नाही.

पक्त बी.एडची डिग्री देणारी कॉलेजेस होणार मर्ज

NCTEने जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे देशातील 15 हजारांहून अधिक बी.एड महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, प्रत्यक्षात पहायला गेलं तर प्रवेशाअभावी ही बी.एड महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.अशा परिस्थितीत,आता एनसीटीईच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फक्त बी.एड पदवी देणाऱ्या महाविद्यालयांना पदवी महाविद्यालयांच्या सहकार्याने काम करावे लागेल. यामुळे ते इतर विषयही शिकवू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.

आता 12वी नंतर बीएड करण्याची संधी

आता देशात बी.एड प्रोग्राममधील प्रवेशाचे निकष बदलले आहेत. ज्याअंतर्गत आता विद्यार्थी बारावीनंतर बी.एड करू शकतात. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना बीए बी.एड, बी.कॉम बी.एड, बी.एससी बी.एड सारख्या पदव्या दिल्या जाणार आहेत. एकंदरीत, बी.एड.च्या अभ्यासक्रमात मोठा बदल झाला आहे. अशा परिस्थितीत, फक्त बी.एड. ची पदवी देणाऱ्या कॉलेजेसवर बंदीचे संकट घोंगावत होतं, मात्र त्यामुळेच आता एनसीटीईने बी.एड.ची प्रणाली बदलण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे बीएडची कॉलेजेस आता डिग्री कॉलेजेसह इतर कोर्सेसही सुरू करू शकतात आणि विद्यार्थ्यांना चार वर्षांची बी.एड पदवी सहज मिळू शकेल.