शेअर बाजारात तेजी-मंदी सुरूच असते. परंतू बाजाराच्या अस्थिरतेकडे दुर्लक्ष करीत मजबूत व्यवसाय आणि फंडामेंटल्स असलेल्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. यामुळे दीर्घकालीन दृष्टिकोनातून ब्रोकरेज कंपनी मिराई अॅसेट शेअरखानने ५ शेअर्सवर खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज कंपनीने दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे शेअर्स निवडले आहेत यासोबतच लक्ष्य किंमतही जारी केली आहे.
ब्रोकरेज कंपनी शेअरखानने (Sharekhan) हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) वर खरेदी रेटिंग दिले आहे. यासाठी २७५५ रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे. १२ जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर, शेअरची किंमत २,३३७ वर बंद झाली. म्हणजेच लक्ष्य किंमतीनुसार १८ टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३०३४ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक २१३६ रुपये आहे.
ब्रोकरेज कंपनी शेअरखानने Aditya Birla Capital वर खरेदी रेटिंग दिले आहे. यासाठी २६६ रुपयांची लक्ष्य किंमत दिली असून १२ जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर, शेअरची किंमत २४२ वर बंद झाली. लक्ष्य किंमतीचा विचार केल्यास १० टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २५०.९५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक १४८.७५ रुपये आहे.
ब्रोकरेज कंपनी शेअरखानने Satin Creditcare Network वर खरेदी रेटिंग दिले आहे. यासाठी २०१ रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे. १२ जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर शेअरची किंमत १६१.३५ रुपयांवर बंद झाली. लक्ष्य किंमतीनुसार शेअरमध्ये २५ टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २४९.६५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक १३१.४० रुपये आहे.
ब्रोकरेज कंपनी शेअरखानने PFC वर खरेदी रेटिंग दिले असून ५३२ रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे. १२ जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर शेअर ४१५.३० रुपयांवर स्थिरावला. लक्ष्य किंमतीनुसार शेअरमध्ये २८ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे. आज या शेअरमध्ये तीन टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५८०.३५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ३५७.२५ रुपये आहे.