घंटागाडी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

इचलकरंजी, घंटागाडी चालक व सहायक या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध क्षण मागण्यांसाठी महापालिका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने सोमवारी महापालिकेसमोर आमरण उपोषणास सुरूवात करण्यात आली. बारा कर्मचाऱ्यांनी (Employees) या उपोषणामध्ये सहभाग घेतला आहे.

 पीएफबाबत किमान वेतन कायद्यानुसार मिळणाऱ्या पगारावर कपात केली जात नाही. २१०० रुपये कपात केली पाहिजे, त्याऐवजी ४०० रुपये कपात केली जाते. गेल्या आठ वर्षांपासून प्राव्हीडंट फंडाबाबत कामगारांची फसवणूक केली जात आहे. याविरोधात समन्वय समितीच्यावतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराला समज देण्याबरोबरच आश्वासनाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी सचिन साठे, विजय कांबळे, अंकुश कुरणे, महादेव कांबळे, अभी जावळे, अजय नेतले, शक्ती गागडे, विठ्ठल  कांबळे, महेश हेगडे, अमोल वासुदेव, सद्दाम देसाई, संजू निकम या बारा कामगारांनी प्राचार्य ए. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास प्रारंभ केला. महापालिके च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच व्यासपीठ मारून उपोषण सुरू करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.