सांगोला तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे पडघम येत्या दिवाळीमध्ये वाजणार असून त्याआधी त्या गावचा दावेदार मालक कोण यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणुका दिवाळीमध्ये घेतल्या जातील असे जाहीर होताच निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी गेल्या वेळेस सरपंच आरक्षण सोडत काढल्या होत्या परंतु आरक्षण सोडत शासनाने रद्दबाबत ठरविल्या आणि पुन्हा नव्याने आरक्षण सोडतीकडे गावातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते गावपुढाऱ्यांची ती इच्छा आता पुरी होणार असून तो दिवस देखील ठरलेला आहे.
सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मंगळवार दि. १५/०७/२०२५
रोजी दुपारी १२-०० वाजता आयोजीत केलेला असून
सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मा. तहसीलदार साहेब सांगोला यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतिभवन सांगोला येथे आयोजित केलेला आहे.
सदर आरक्षण सोडती बाबतचे माहिती पत्रक स्वतः मा. तहसिलदार संतोष कणसे यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आला आहे सदर सरपंच आरक्षण सोडत साठी सांगोला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे यांनी केलेले आहे.
