डॉ . शंकरराव खरात स्मृती साहित्य संमेलन आज आटपाडीत

ग्रामीण साहित्य आणि शेतकरी जीवनावर आधारित विचारांचे मंथन करण्यासाठी आटपाडी येथे आज, शुक्रवार ,दि ११ रोजी डॉ, शंकरराव खरात (Shankarrao Kharat) स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे उदघाटन कल्लेश्वर देवस्थान सभागृहात सकाळी १० वाजता भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्याहस्ते होणारे आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे अध्यक्ष्यस्थानी असून जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .

सकाळी ११. ३० वाजता ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ ग्रामीण साहित्यातील शेतकरी जीवन ‘ या विषयावर परिसंवाद होईल परिसंवादात डॉ. कृष्णा इंगोले प्राचार्य . डॉ. सयाजीराजे मोकाशी , प्रा . डॉ. वामन जाधव यांचे विचारमंथन होणार आहे. प्रा. सुभाष कवडे सूत्रसंचालक आहेत. दुपारी २ वाजता कविसंमेलन होईल , प्रा श्रीकृष्ण पडळकर अध्यक्षस्थानी असून इंद्रजित घुले सुत्रसंचालन करणार आहेत . राज्यभरातून नामवंत कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत.

दुपारी ४. ३० वाजता संमेलनाचा समारोप समारंभ होईल .समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे आहेत, माजी राजेंद्रअण्णा देशमुख स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनास मान्यवर लेखक , साहित्यिक उपस्थित राहणार असून साहित्यिकप्रेमींनी या संमेलनात सहभागी व्हावे , असे आवाहन साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानने केले आहे.