इस्लामपूर, सांगली जिल्ह्यातील बागडी समाज आणि मच्छी व्यावसायिक | यांचा मेळावा रविवार ता. २७ जुलै रोजी तुंग येथे सकाळी १० वा संपन्न | होणार आहे तरी सर्व बागडी समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, | असे आवाहन सांगली जिल्हा अध्यक्ष रघुनाथ बागडी यांनी केले.
सदर मेळाव्यासाठी महाराष्ट्र बागडी समाज अध्यक्ष विकास बागडी | उपाध्यक्ष एकनाथ बागडी, सरचिटणीस प्रा. संजय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच राज्य महिला अध्यक्षा सुलोचना बागडी, राज्य | संघटक जगन्नाथ सोनवणे व कोषाअध्यक्ष शिवाजी बागडी हे ही समाज | बांधवांचे प्रबोधन करणार आहेत. समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि | विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा समाजातर्फे गौरव करण्यात येणार आहे. त्यावेळी अरुण तावरे, उमराव कारंडे, रामदास बागडी, शंकर सुपेकर, सुनिल बागडी, मधुकर सासणे, सुभाष बागडी, आप्पासाहेब बागडी, अजयकुमार बागडी व इतर समाज | बांधव उपस्थित राहणार आहेत.
