आगामी विधानसभेचा उमेदवार…..

लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 45 हजारापेक्षा अधिक मताधिक्य दिलेल्या मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य हे मंगळवेढयातील असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आगामी उमेदवार हा मंगळवेढ्यातीलच द्यावा.यासाठी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती शहराध्यक्ष चंद्रशेखर कोडूभैरी दिली.कायम राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारत भालके हे विजयी झाले त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके निसटच्या मताने पराभूत झाले.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील मतदारांनी चांगले योगदान दिले. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर राष्ट्रवादीमधून विठ्ठल कारखान्याचे अभिजीत पाटील हे इच्छुक होते त्यांनीही लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवाराचे समर्थन केले त्यामुळे पंढरपूरच्या संभाव्य उमेदवारानी त्यांच्या राजकीय सोयीसाठी पक्षाला सोडचिट्टी दिली.दरम्यान मतदारसंघातील जनतेचे प्रश्न तसेच राहिल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही जनतेनेच हातात घेतल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 45 हजारपेक्षा अधिक मताधिक्य प्रणिती शिंदेला मिळाले त्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य हे मंगळवेढयातील राहिले.

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अभिजीत पाटील व भगीरथ भालके हे दोघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र त्यांचा पक्ष मात्र अनिश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा उमेदवार हा पंढरपुरातून न देता मंगळवेढ्यातील द्यावा ही मागणी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करणार आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार कोण हे अद्याप निश्चित केली नसताना शहराध्यक्ष कोंडूभैरी यांनी केलेल्या मागणीकडे पक्ष नेतृत्व लक्ष देणार का ? याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली