जैन समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या नांदणी येथील महादेवी हत्तीणला गुजरात येथे स्थलांतर केल्याप्रकरणी आष्टा (Ashta) शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. याबाबत तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद आष्टा शहर व पंचक्रोशीत उमटले आहे. या प्रकरणावरून आष्टेकर एकवटले आहेत. आष्टा शहरवासियांतर्फे शनिवारी २ रोजी सकाळी आठ वाजता प्रमुख मार्गांवरून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी आष्टा शहर राष्ट्रवादी युवक (काँग्रेस शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष म्हणाले, जैन समाजाचे पवित्र श्रध्दास्थान असलेल्या नांदणी येथील महादेवी हत्तीणला गुजरात येथे स्थलांतर करण्यामागे एका उद्योगपतीचा हात आहे. पैसा व सत्ता याच्या जोरावर धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे कृत्य राज्य सरकारने राजकीय हेतू व अंबानींचा हट्ट यामुळे केले असून याचा जाहीर निषेध करतो. यावेळी प्रभाकर जाधव, दीपक मेथे, सयाजी गावडे, सिद्धार्थ हाबळे, शशिकांत भानुसे उपस्थित होते.
