2 लाखापर्यंत पगार, सरकारी नोकरीची मोठी संधी, ESIC मध्ये असिस्टंट प्रोफेसरपदाची भरती

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि त्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ज्यामध्ये 243 पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना (ESIC Jobs 2025) जारी करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार ESIC esic.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच हि निवड कशी होईल, त्यासाठी काय अटी आणि नियम आहेत ते जाणून घेऊया.

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ ने सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 243 पदांसाठी भरतीसाठी(recruitment) अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार esic.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. तसेच यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आपण 15 सप्टेंबरपूर्वी यासाठी अर्ज करू शकता.

किती पदांसाठी होणार आहे भरती?

सामान्य श्रेणी – 97 पदे

SC श्रेणी – 40पदे

ST श्रेणी – 18 पदे

OBC श्रेणी – 63 पदे

EWS श्रेणी – 25 पदे

अशी असेल शैक्षणिक पात्रतेची अट

पदवी प्राप्त केल्यानंतर वरिष्ठ निवासी म्हणून 3 वर्षांचा अध्यापन अनुभव.

वयोमर्यादा किती असावी:
सामान्य (पुरुष): कमाल वयोमर्यादा 40 वर्षे. ESIC मध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वयात 5 वर्षांची सूट

कशी केली जाईल निवड?
निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

किती दिला जाईल पगार?

पे मॅट्रिक्स लेव्हल 11 नुसार, 67,700 रुपये – 2,08,700 रुपये

अर्ज शुल्क किती असेल?
सामान्य श्रेणी – 500 रुपये

महिला, अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि ESIC कर्मचाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क नाही

अर्ज कसा करावा?

esic.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करा.

फॉर्म भरा आणि स्वतःची साक्षांकित कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जोडा.

फॉर्म एका लिफाफ्यात टाका आणि त्यावर ‘वैद्यकीय संस्थांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज’ असे लिहा.