भारतातील पहिला दिव्यांग पूरक सिग्रल ठाण्यात

देशातील पहिला दिव्यांग पूरक सिग्रल ठाण्यात (Thane) तयार करण्यात आले असून सर्व प्रकारच्या सुविधा असल्याने त्यातून सुगम्य वातावरणाची निर्मिती झाली आहे. वाहतुक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या वतीने आणि ठाणे शहर वाहतुक शाखा आणि मंगेश देसाई यांच्या सहकार्याने ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली आहे.

ठाण्यात नागरीकरणासोबतच वाहनांची संख्या वाढत आहे. तीनहात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी – माजिवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात. या जंक्शनवर सिग्नल यंत्रणाअसली तरी डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावे लागते. दृष्टीहिनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कधी कधी अन्य व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. अशा वेळी बीपरच्या सहाय्याने त्यांना सिग्नल समजून असे व्यक्ती सहज रस्ता ओलांडू शकतात.

अस्थिव्यंग आणि अपंग लोकांकरीता प्रत्येक सिग्नल व रॅम्प तयार करण्यात आलेअसुन त्यावरून व्हिलचेअर जाण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे त्याच्या बाजुला पकडण्याकरीता रेलींग लावले असुन वृद्ध लोकांसह इतर शारिरिक अपंगत्व असणा-या सर्व व्यक्तीकरिता उपयुक्त ठरत आहे. रॅम्प वर टेकटाईल लावण्यात आल्या असून प्रत्येक सिग्नलला अशाप्रकारचे ब्रेलमधील बोर्ड लावले आहेत. रस्त्यावरील थर्मर चित्र हे देखील दृष्टीबाधितांना त्याच्या स्पर्शातून जाणवेल असे करण्यात आले आहे.

या दिव्यांग पूरक सिग्लनची संकल्पना डॉ. सुमित पाटील यांची आहे. दिव्यांगासह इतरही सर्व सामान्य पादचारींना या सिग्नलची मदत होत आहे. भारतातील अशी सर्वसमावेशक सर्वात मोठी सिग्नल यंत्रणा ठाण्यातील “ तीनहात नाका” सिग्नल हा पहिला ठरला असून त्यातून नक्कीच दिव्यांग व्यक्तींची अडचण दूर होत असल्याची प्रतिक्रिया सुमित पाटील यांनी दिली.

दिव्यांग पूरक सिग्नल म्हणजे काय?
दिव्यांग पूरक सिग्नल म्हणजे दृष्टिहीन, श्रवणबाधित किंवा इतर अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी विशेषतः तयार केलेल्या सुविधा, ज्या ट्रॅफिक सिग्नल्स, संदेशवहन उपकरणे किंवा सांकेतिक भाषा यांच्या माध्यमातून त्यांना स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे कार्य करण्यास मदत करतात. यामध्ये ध्वनी-आधारित सिग्नल्स, स्पर्शनीय बटणे, ब्रेल लिपी, किंवा फ्लॅशिंग लाइट्स यांचा समावेश होतो.

दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सिग्नल्सची गरज का आहे?
दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे फिरण्यासाठी विशेष सुविधांची गरज असते. उदाहरणार्थ, दृष्टिहीन व्यक्तींसाठी ध्वनी-आधारित ट्रॅफिक सिग्नल्स रस्ता ओलांडण्यास मदत करतात, तर श्रवणबाधित व्यक्तींसाठी दृश्य सिग्नल्स आवश्यक असतात. या सुविधा त्यांचे जीवन सुगम आणि अडथळामुक्त करतात.

2011 च्या जनगणनेनुसार, भारतात अंदाजे 2.68 कोटी दिव्यांग व्यक्ती आहेत. यापैकी दृष्टिहीन (सुमारे 50 लाख) आणि श्रवणबाधित (सुमारे 50 लाख) व्यक्तींसाठी विशेष सिग्नल्सची गरज आहे. ही गरज विशेषतः शहरी भागात आणि रस्त्यांच्या जंक्शन्सवर जास्त आहे.