भारताच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ची नुकतीच स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रिया झाली. आता सूर्यकुमार यादवच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. शस्त्रक्रियेनंतर भारतीय कर्णधार पहिल्यांदाच सरावात परतला आहे. गेल्या आठवड्यात सूर्यकुमार यादव बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करताना दिसला. या भारतीय खेळाडूवर जुलै 2025मध्ये जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. आता सूर्याकुमार यादव आशिया कप खेळणार की नाही याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
पोटाच्या खालच्या उजव्या भागाच्या शस्त्रक्रियेतून बरा होत असल्यापासून सूर्यकुमार यादव बीसीसीआच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे. आता हळूहळू पुढील काही आठवड्यात सूर्यकुमार यादव वर्कलोड वाढेल आणि तो 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 आधी टीम इंडियामध्ये परतेल. यावेळी आशिया कप संयुक्त अरब अमिराती मध्ये होणार आहे. बीसीसीआयने पुष्टी केली की, सूर्या हळूहळू तंदुरुस्त होत आहे आणि आशिया कप 2025 साठी पूर्णपणे तयार होण्याच्या मार्गावर आहे. “
सूर्यकुमार यादव ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत पुनरागमन करणार होता, परंतु आता ही मालिका पुढील वर्षी 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, सूर्यकुमार आता थेट आशिया कपमध्ये खेळताना दिसेल. दुलीप ट्रॉफीमध्ये सूर्याचा पश्चिम विभागाच्या संघातही समावेश होता, परंतु शस्त्रक्रियेमुळे या खेळाडूला ही स्पर्धा सोडावी लागली. पुनर्वसनासाठी सूर्याने आधीच एनसीएमध्ये तपासणी केली होती, ज्यामुळे सध्या त्याचे स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन शक्य नाही असे सूचित होते. शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभागाच्या संघात श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान सारखे अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत.
