कुंभोज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण सोहळा खा. धैर्यशील माने, माजी खा. राजू शेट्टी, आ. राजूबाबा आवळे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, माजी अध्यक्ष डी. सी. पाटील, बाबासाहेब पाटील, माजी सभापती पद्माराणी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले अरुण पाटील, दलित मित्र अशोक माने, सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे यांच्या उपस्थितीत झाला.
कुंभोज येथे आरोग्य केंद्र अद्यावत झाल्यामुळे रुग्णसेवा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दवाखान्याची इमारत किती सुंदर आहे हे महत्त्वाचे नसून दवाखान्यात काम करणारे कर्मचारी व डॉक्टर किती गुणवंत आहेत यावर त्या दवाखान्याचे महत्त्व अवलंबून असते. दवाखान्यांमध्ये सर्व सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून येणाऱ्या काळात दवाखान्याकडे येणारा रस्ता दवाखान्यासाठी आवश्यक असणारे संरक्षक व अन्य सेवा सुविधा पुरवल्या जातील असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले.