भारतीय पोस्ट खात्याचा मोठा निर्णय…जुनी टपाल सेवा होणार बंद

भारतीय पोस्ट खात्याने मोठा निर्णय(decision) घेतला आहे. 1854 पासून मुंबईचं हृदय असलेली टपाल सेवा (service)1 सप्टेंबरपासून आता बंद होणार आहे. त्यामुळे पत्रं नाही फक्त नोटिफिकेशन राहणार आहे. आता यापुढे महत्त्वाची कागदपत्रं आणि पार्सल पाठवण्यासाठी आता एकमेव स्पीड पोस्ट सेवा राहणार आहे. भारतीय पोस्टाची रजिस्टर्ड पोस्ट सेवा 50 वर्षांहून अधिक काळ असलेली सेवी आता भूतकाळात जाणार आहे.

पोस्टानं आपलं काम फास्ट, ट्रॅक करण्यास सोपं आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. पोस्टानं सर्व सरकारी विभाग, न्यायालयं, विद्यापीठे आणि इतर संस्थांना 1 सप्टेंबरपूर्वी त्यांच्या सेवा स्पीड पोस्टला हस्तांतरित करावे असं सांगण्यात आलं आहे.