जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि त्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ज्यामध्ये 243 पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार ESIC esic.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच हि निवड कशी होईल, त्यासाठी काय अटी आणि नियम आहेत ते जाणून घेऊया.
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ ने सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 243 पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार esic.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. तसेच यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आपण 15 सप्टेंबरपूर्वी यासाठी अर्ज करू शकता.
किती पदांसाठी होणार आहे भरती?
सामान्य श्रेणी – 97 पदे , SC श्रेणी – 40पदे, ST श्रेणी – 18 पदे, OBC श्रेणी – 63 पदे, EWS श्रेणी – 25 पदे,
शैक्षणिक पात्रतेची अट : पदवी प्राप्त केल्यानंतर वरिष्ठ निवासी म्हणून 3 वर्षांचा अध्यापन अनुभव.
वयोमर्यादा
सामान्य (पुरुष): कमाल वयोमर्यादा 40 वर्षे. ESIC मध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वयात 5 वर्षांची सूट
निवड प्रक्रिया : निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा करावा?
esic.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
फॉर्म भरा आणि स्वतःची साक्षांकित कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जोडा.
फॉर्म एका लिफाफ्यात टाका आणि त्यावर ‘वैद्यकीय संस्थांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज’ असे लिहा.
स्पीड पोस्टने तो दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
