विटा,(vita) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत बुधवारी उत्साहात पार पडली. यावेळी आ. सुहास बाबर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील या प्रमुख नेत्यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सभागृहात गर्दी केली होती. यामध्ये काही उमेदवारांच्या पदरी निराशा आली तर अनेकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत.
येथील विटा नगरपालिकेच्या अल्पबचत भवनात बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. तर आरक्षण सोडतीसाठी शिवसेना आमदार सुहास बाबर, भाजप नेते वैभव पाटील, माजी उपनगराध्यक्ष किरण अॅड. सचिन जाधव, कृष्णात गायकवाड, विलासराव कदम, नंदकुमार पाटील, अमर शितोळे, अॅड. अजित गायकवाड, अॅड. सुमित गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विटा नगरपालिकेसाठी प्रभागनिहाय आरक्षण असे : प्रभाग एक – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुले, प्रभाग दोन -ओबीसी महिला आणि सर्वसाधारण खुले, प्रभाग तीन – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुले, प्रभाग चार – ओबीसी महिला आणि सर्वसाधारण खुले, प्रभाग पाच – अनुसुचित जाती आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग सहा – ओबीसी महिला आणि सर्वसाधारण खुले, प्रभाग सात-ओबीसी सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग आठ – सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रभाग नऊ -अनुसुचित जाती महिला आणि सर्वसाधारण महिला खुले, प्रभाग दहा – ओबीसी महिला आणि सर्वसाधारण खुले, प्रभाग अकरा-अनुसुचित जाती महिला आणि सर्वसाधारण खुले, प्रभाग बारा – ओबीसी सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग तेरा -अनुसुचित जाती आणि सर्वसाधारण महिला
