पेठवडगांव(Peth Vadgaon),हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनयराव कोरे यांच्याहस्ते झाले. हातकणंगले तालुक्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी पेठ वडगाव येथील जनसंपर्क कार्यालय उपयुक्त ठरणार आहे.
आम. डॉ. अशोकराव माने यांनी, या कार्यालयामुळे जनतेची कामे होणार असल्याचे सांगत गेल्या वर्षभरातील विकास कामाचा लेखाजोखा मांडला. आम. डॉ. कोरे म्हणाले की, जनसंपर्क कार्यालयामुळे सर्वसामान्य लोकांची कामे होणार आहेत. तालुक्याला कामासाठी जावे लागणार नाही. जनसंपर्क कार्यालयामुळे अनेक प्रश्न सुटतील.
यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी जि. प. सदस्य अरुण इंगवले, वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, शिवाजी पाटील, उदय पाटील, सुभाष पाटील, वडगांव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष अशोक माळी, राजेंद्र माने, अजय थोरात, भाजपा मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने, सुहास राजमाने,वारणा दुध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, महेंद्र शिंदे, वारणा बँक संचालक प्रकाश माने, भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष तय्यब कुरेशी, शिवसेना शहर प्रमुख अक्षय मदने, डॉ. अभयसिंह यादव, सागर भोसले, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने, सुनीता पोळ, निर्मला सावर्डेकर, सुरेखा सूर्यवंशी, बानू नदाफ, पूजा सूर्यवंशी, अर्चना भोपळे, रोहित दणाणे, ऋषिकेश यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजपा, महायुतीतील मित्रपक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
