हणबर समाजाचा २४ रोजी गुणवंत गौरव सोहळा

हातकणंगले,हणबर समाज उन्नती संस्था यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श पुरस्कार वितरण समारंभ रविवार ता. २४ रोजी सकाळी १० वाजता अहिल्या मल्टीपर्पज हॉल, अतिग्रे,इचलकरंजी – कोल्हापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या हांडे, संयम हुक्कीरे, तालुकाध्यक्ष अजित कोणे उपस्थित होते. सर्व हणबर बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.