वृक्ष लागवडीत सोलापूर जिल्हा समृद्ध करूया : अजित कंड्रे

सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या ३ टक्के वृक्ष लागवड आहे. ही लागवड आ. सुभाषबापू देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व सोलापूर सोशल फौंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड करून सोलापूर जिल्हा समृद्ध करूया, असे विचार सोशल फौंडेशनचे सल्लागार अजित कंड्रे (Ajit Kandre) यांनी व्यक्त केले.

माणगंगा ब्रह्मणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सांगोला तालुक्यातील माण नदी काठावर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन अशा खुल्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेसाठी लागणारी विविध प्रकारची रोपे सोशल फौंडेशन सोलापूर यांच्या वतीने पुरविण्यात आली होती , या रोपाच्या वाटपप्रसंगी अजितदादा कंड्रे बोलत होते. वृक्षारोपण स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांच्या ग्रामपंचायतींनी दि . १४ ऑगस्ट रोजी या रोपाचे वाटप सोशल फौंडेशनचे सल्लागार अजितदादा कंड्रे , सोशल फौंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील, डॉ. श्रीधर यलमार , ॲड . गजानन भाकरे यांच्या हस्ते विविध गावच्या ग्रामस्थांना रोपांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी माणगंगा भ्रमण सेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे , उपाध्यक्ष डॉ. विजय जाधव , सचिव डॉ. राजेंद्र सूर्यवंशी , तसेच चिणके गावचे उपसरपंच मोहन मिसाळ ,तानाजी केदार , सुरेश मिसाळ , तानाजी मिसाळ , राजेश मिसाळ मुख्याध्यापक बंडगर गुरुजी , सुहास राऊत , माजी सरपंच गोपाळ मिसाळ , राजू झरे इ.सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मोहन मिसाळ यांनी केले.