विट्यात अमोल बाबर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विटा(vita) सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानासह कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांची गर्दी उसळली होती. हजारो लोकांनी प्रत्यक्ष भेटून दादांना शुभेच्छा दिल्या, तर अनेकांनी दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त केल्या.

 याप्रसंगी अनेक मान्यवरांनी अमोल दादांच्या नेतृत्वाचे आणि समाजातील योगदानाचे विशेष कौतुक केले. बँक संचालक म्हणून त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेल्या उपक्रमांची प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या पुढाकारामुळे बँकेची ग्रामीणभागातील पत अधिक मजबूत झाली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

 अमोल बाबर हे केवळ बँकेचे संचालक म्हणूनच नव्हे तर समाजाभिमुख नेते म्हणूनही ओळखले जातात. शेतकरी हिताची जाणीव ठेवून आर्थिक मदतीची तत्परता व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा अनेक योजना राबवल्या. ग्रामविकास, शिक्षण, क्रीडा, आरोग्य अशा क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

 ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, युवकांना रोजगाराभिमुख संधी देणे आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा वसा जपला आहे.

 आज वाढदिवसानिमित्त त्यांना माजी आ. शहाजी बापू पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, दत्तात्रय पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ शिंदे, बाबासाहेब भोसले, बंडूशेठ कातुरे, चवरे सर, गणपतराव भोसले, शिवसेना नेते संजय बापू विभुते, विनोद गुळवणी, बाळासाहेब होनराव, पप्पू दाजी कदम, अमर शितोळे, धर्मेश पाटील, तासगावचे माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोणपे, शिवसेना शहराध्यक्ष राजू जाधव यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.) सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानासह कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांची गर्दी उसळली होती. हजारो लोकांनी प्रत्यक्ष भेटून दादांना शुभेच्छा दिल्या, तर अनेकांनी दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त केल्या.

 याप्रसंगी अनेक मान्यवरांनी अमोल दादांच्या नेतृत्वाचे आणि समाजातील योगदानाचे विशेष कौतुक केले. बँक संचालक म्हणून त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेल्या उपक्रमांची प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या पुढाकारामुळे बँकेची ग्रामीणभागातील पत अधिक मजबूत झाली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

 अमोल बाबर हे केवळ बँकेचे संचालक म्हणूनच नव्हे तर समाजाभिमुख नेते म्हणूनही ओळखले जातात. शेतकरी हिताची जाणीव ठेवून आर्थिक मदतीची तत्परता व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा अनेक योजना राबवल्या. ग्रामविकास, शिक्षण, क्रीडा, आरोग्य अशा क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

 ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, युवकांना रोजगाराभिमुख संधी देणे आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा वसा जपला आहे.

 आज वाढदिवसानिमित्त त्यांना माजी आ. शहाजी बापू पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, दत्तात्रय पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ शिंदे, बाबासाहेब भोसले, बंडूशेठ कातुरे, चवरे सर, गणपतराव भोसले, शिवसेना नेते संजय बापू विभुते, विनोद गुळवणी, बाळासाहेब होनराव, पप्पू दाजी कदम, अमर शितोळे, धर्मेश पाटील, तासगावचे माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोणपे, शिवसेना शहराध्यक्ष राजू जाधव यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.