भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये काही कारना कायमच ग्राहकांची पसंती मिळते. मुळात अनेकदा कारच्या मॉडेलपेक्षा कंपनीच्या नावावर असणारा ग्राहकांचा विश्वास इथं महत्त्वाची भूमिका बजावतो असं म्हणणं गैर ठरणार नाही. भारतीय ऑटो जगतात असे अनेक ब्रँड, अशा अनेक कंपन्या अस्तित्वात असल्या तरीसुद्धा त्यात TATA चं नाव तितक्याच आदरानं घेतलं जातं. सामान्यांना परवडणारे दर आणि तितक्याच कमाल कार ही या कंपनीची जमेची बाजू.
अशा या टाटा कंपनीच्याच (TATA Company) एका चांगल्या आणि खिशाला परवडणाऱ्या कार खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. जाणून आश्चर्य वाटेल, मात्र 30 हजार रुपये पगार असणारी व्यक्तीसुद्धा टाटाची ही कार खरेदी करु शकणार आहे. ही बहुचर्चित कार म्हणजे, Tata Tiago. एक्स शोरुम बेस प्राईज 5 लाख रुपये असणारी ही कार अनेकांसाठीच एक परफेक्ट फॅमिली कारही ठरते.
ही कार खरेदी करत असताना पूर्ण रक्कम भरावी लागत नाही. तर, फक्त खरेदीदारांना 50000 रुपयांचं डाऊनपेमेंट देणं अपेक्षित असून उर्वरित रकमेवर कर्ज घेत ही कार सहजगत्या घरात आणता येईल. आता हे कर्जाचं गणित कस असेल? हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर, त्याचं उत्तरही इथेच आहे.
समजा एखाद्या व्यक्तीचा पगार आहे 30 ते 40 हजार किंवा त्यादरम्यान. तर, अशा मंडळींसाठी 7 वर्षांचा EMI प्लान उत्तम ठरणार आहे. 5 वर्षांच्या EMI मध्ये तुम्हाला व्याज स्वरुपात 1.40 लाख रुपये द्यावे लागणार आहेत, जिथं कारची एकूण रक्कम 7 लाखांच्या घरात पोहोचते. देशातील प्रत्येक शहरानुसार या कारच्या कर्जाचं गणित बदलतं. ज्याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत TATA Showroom मधून मिळू शकते.
कारच्या फिचरबाबत सांगावं कर, टाटाची ही कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह येत असून तिचं सीएनजी वर्जनसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध असून, पेट्रोल वर्जनमध्ये ती 20.09 किमी इतकं मायलेज देते. तर सीएनजीमध्ये हेच प्रमाण 28 किमी प्रति किलोवर पोहोचतं. कारचे फिचर्स, फ्रंट आणि बॅक सीटला असणारा लेग स्पेस इथपासून ते कारची आसनव्यवस्था सर्वकाही अपेक्षांप्रमाणंच असल्यानं अनेक लहान कुटुंबांसाठी ही कार एक उत्तम पर्याय ठरत आहे. त्यातच टाटासारख्या ब्रँडकडून ही कार तयार केली जात असल्यानं या ब्रँडच्या विश्वासार्हतेचा फायदासुद्धा या काराला मिळतान दिसत आहे, हेच खरं !
