ठाणे महापालिकेत मेगा भरती, १,७७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) अंतर्गत ‘गट क आणि गट ड’ संवर्गातील रिक्त पदांच्या १ हजार ७७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार ‘ठाणे महानगरपालिका’चे अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे.

ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे. पालिकेतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील एकूण १ हजार ७७३ जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे. इच्छुक उमेदवार ठाणे महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ठाणे महानगरपालिका गट ‘क’ आणि ‘ड’ मधील रिक्त जागा भरत आहे. यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय अशा विविध विभागांमध्ये भरती आहे. एकूण १ हजार ७७३ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २ सप्टेंबर २०२५ पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या वेबसाईटला भेट द्या. या भरती अंतर्गत विविध ६५ पदांसाठी उमेदवार निवडले जाणार असल्याचे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क यामध्ये पदानुसार भिन्नता आहे. त्यामुळे अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचावी.