सांगोला तालुक्यातील एखतपूर (Ekhatpur) महूद रोड परिसरात शुक्रवार (ता. २२) रोजी लांडग्याने हल्ला चढवून सात नागरिकांना गंभीर जखमी केले. यामध्ये एका महिलेस सहा पुरुषांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जखमींपैकी चार नागरिकांवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात प्रथोमपचार पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठविले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर जखमींपैकी दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. एका नागरिकाला किरकोळ जखमा झाल्याने प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर यांनी आपले पथक घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देत लांडग्याचा शोध सुरु केले आहे.
