नाशिकमधील दिंडोरी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याच आज अनावरण करण्यात आलं. यावेळी आयोजित समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे मटण खाण्याच्या वादावर भाष्य केलं आहे, तसेच महायुती सरकारवरही टीका केली आहे. मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं असं सुळे यांनी म्हटलं आहे, यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मटण खाल्लं तर पांडुरंगाला चालतं
सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांना या समारंभात बोलताना मटण खाण्याबाबत बोलताना म्हटले की, ‘मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय? असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सत्ताधाऱ्यांवर टीका
सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी पुढे बोलताना सत्ताधाऱ्यांवरही टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही, माझ्या आईचेही गुण माझ्या अंगात त्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी मी सत्याची बाजू कधी सोडणार नाही, अन्यायाविरोधात झुकणार नाही. माझी ताकद माझी इमानदारी आहे. माझी विकासाची आयडिया आणि सरकारची विकासाची आयडिया यात फरक आहे. इथे बसलेल्या महिलेची काचेही बांगडी सोन्याची होईल त्याला विकास म्हणतात. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल तेव्हा विकास म्हणतात असं सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘याच उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील.’
