सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, च्या संशोधन आणि विकास विभागाने तांत्रिक शिक्षणातील प्रकल्प मार्गदर्शकांची भूमिका या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष व्ही. जाधव यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून दर्जेदार संशोधन कार्य कसे करून घ्यावे, विद्यार्थ्यांच्या प्रकल्प उपक्रमाचा उपयोग समाजासाठी फायदेशीर उत्पादने तयार करण्यासाठी कसा करायचा आणि विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य कसे प्रकाशित करायचे याविषयी त्यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस चे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा. श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, संचालक डॉ. डी. एस. बाडकर, डिग्री इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, पॉलिटेक्निक प्राचार्य डॉ.शरद पवार व प्रा. टी. एन. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.