उद्या 3 जानेवारी रोजी सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमांत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. याचे आयोजन केळकर हॉस्पिटल येथे आयोजित केलेले आहे. यामध्ये वंधत्व तपासणी मार्गदर्शन व उपचार या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा, आबासाहेब केसरी बैलगाडा शर्यत, शैक्षणिक साहित्य वाटप, कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिरे, खाऊ वाटप, वंधत्व व निवारण, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबिर असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आरोग्य शिबिरामध्ये वंध्यत्व तपासणी यामध्ये दहा हजार रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. वंध्यत्व निवारणानंतर प्रेग्नेंसी मधील डिलिव्हरी करता 59% सवलत सामाजिक बांधिलकी म्हणून देण्यात येणार आहे. तसेच मेटकरी पट्टा गारमेंट येथे तीन जानेवारी म्हणजेच उद्या भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
आलेगाव येथे सहा जानेवारी रोजी भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. पाच व सहा जानेवारी रोजी अकोला येथे शिवरत्न क्रीडा मंडळ व पुरोगामी युवक संघटना अकोला यांच्यावतीने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
गुरुवारी 18 जानेवारी रोजी सांगोला फॅबटेक सुतगिरण सांगोला येथे आबासाहेब केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत होणार आहे.