तीन तलावांच्या सुशोभीकरणासाठी खानापूर मतदारसंघांमध्ये साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यामध्ये पारे (दरगोबा), ढवळेश्वर (विटा) व आटपाडी या तीन तलावांचा समावेश होतो अशी माहिती सुहास बाबर यांनी दिली.
खानापूर मतदार संघातील पारे ढवळेश्वर व आटपाडी या तीन तलावांचे सुशोभीकरण होऊन ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी या योजनेतून निधी मिळावा यासाठी आमदार अनिल बाबर यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते. त्यानुसार या तलावासाठी म्हणजेच ढवळेश्वर (विटा) तलावासाठी दोन कोटी 88 लाख, पारे (दरगोबा) तलावासाठी तीन कोटी 71 लाख व आटपाडीसाठी दोन कोटी 85 लाख असा सुमारे साडेनऊ कोटींचा निधी मंजूर झाला.
आता लवकरच या तलावांच्या सुशोभीकरणाची कामे गतीने पूर्ण करून नागरिकांसाठी ती खुली केली जातील असे सुहास बाबर यांनी सांगितले. विटा पालिकेच्या निवडणुकीवेळी शहराजवळ असणाऱ्याढवळेश्वर तलावाचे सुशोभीकरण करण्याचा शब्द आमदार अनिल बाबर यांनी दिला होता. तो शब्द पूर्ण झाला आहे.
टेंभूचे पाणी आलेले असून या पाण्याने तलाव भरले जात आहेत त्याच्या विकासाचा पुढचा टप्पा सुशोभीकरणाचा असून ते काम तातडीने सुरू करण्यात येईल निधी मंजूर झाल्याने विलंब होणार नाही असेही सुहास बाबर म्हणाले.