गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सांगली दौरा झाला. पवार साहेब परतताच सांगली जिल्ह्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे.
या 5 फेब्रुवारीला विटा आणि जत येथे शेतकरी मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हाध्यक्ष वैभव पाटील तालुका दौरे करून शक्तीप्रदर्शनाची तयारी करीत आहेत. या मेळाव्यामध्ये अन्य पक्षातील काही नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
याशिवाय काही माजी आमदारांची ही चाचपणी केली जात आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री जत तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित 65 गावांची विस्तारित योजना मार्गी लावण्यासाठी तालुकाध्यक्षांनी कंबर कसली आहे.