वातावरणात सतत बदल होताना आपल्याला पहायला मिळतच आहे. तसेच अवकाळी पाऊस यामुळे देखील अनेक शेतकर्यांचे नुकसान देखील झाले. अनेक भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर
टेंभूच्या पाण्याची उपलब्धता होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यानी ऊस लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे या परिसरात उसाचे क्षेत्र वाढू लागले आहे.
परंतु या परिसरातील ऊस उत्पादक कारखान्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होऊ लागली असून ऊस तोडी कामगारांची कमतरता असल्याचे कारणे सांगून ऊस तोडण्यास विलंब लावला जात आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचे फड अजूनही तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. ऊस तोडणी लांबल्याने उसाला तुरे फुटणे सुरुवात झाली असून, त्यामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.