विट्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अलीकडच्या काळात फसवाफसवीच्या घटना घडताना पाहतच असतो. अशीच एक घटना विट्यात उघडकीस आलेली आहे. विट्यात लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईने संशयित धैर्यशील सिध्देश्वर स्वामी (रा. देवनगर, ता. खानापूर) याच्या विरोधात विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पीडित १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला संशयित धैर्यशील याने लग्नाचे आमिष दाखवून ऑक्टोबर ते नोव्हेबर २०२३ या दरम्यान विट्यातील एका हॉटेलमध्ये तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.
यातून संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी पाच महिन्याची गर्भवती झाली. या प्रकरणी संशयित धैर्यशील स्वामी याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.