इचलकरंजी, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभाग रचना बुधवार ता. ३ रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण,रात्री उशिरापर्यंत महानगरपालिकाकडून राज्य निवडणूक आयोगकडून कोणतीच घोषणा न इच्छुकांची धाकधूक वाढली. तर दिवसभर अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. महानगरपालिकेचे प्रारूप रचना आराखडा उद्या गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान,महानगरपालिकेच्या, आयुक्त पल्लवीपाटील या पहाटेच मुंबईकडे रवाना झाल्या होत्या.
याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रारुप प्रभाग रचना आराखडा १३ रोजी राज्यातील अनेक महानगरपालिकांसाठीची जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पहायला मिळाली. पण, इचलकरंजी महानगरपालिकेची लिंक रात्री उशिरा पर्यंत उपलब्ध झाली नाही.निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी दिवसभर या विषयावर चर्चा करताना आढळून आले. तर महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. न्यायालयाच्या आदेशानुसार १३ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना व इतर माहिती संकलीत करण्याचे आदेश दिले आहेत.
इचलकरंजी महानगरपालिकेसाठी १६ प्रभाग निश्चित केले असून १ ते १५ प्रभागात ४ सदस्य असतील तर प्रभाग १६ हा मोठा असल्याने यातून ५ सदस्य निवडले जाणार आहेत. दरम्यान, बुधवारी आपापला प्रभाग कशा पद्धतीने रचना झाली हे न समजल्याने घोर निराशा झाली.
