मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक निर्णयामुळेच सकल मराठा (Maratha)समाजाचा आरक्षणाचा तिढा सुटला. बांधवांना न्याय मिळाला. अशी प्रतिक्रिया विट्याचे माजी नगराध्यक्ष , भाजप नेते वैभव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
वैभव पाटील यांनी म्हटले आहे कि, मराठा बांधवांनी एकजुटीने जरांगे – पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या हक्कासाठी केलेल्या लढ्याला ऐतिहासिक निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी खूप मेहनतीने आरक्षणाच्या लढ्याची सुरवात करून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर, सातारा गॅझेटसाठी येणाऱ्या महिन्यात स्वतंत्र जीआर,तसेच मराठा(Maratha) व कुणबी एकच आहेत. हा निर्णय जलदगतीने घेण्याबाबत तसेच मराठा आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय आणि त्याचबरोबर मृत आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीच्या निर्णयाबरोबरच आंदोलकांच्या वाहनांना आरटीओ कार्यालयातून झालेला दंड माफ अशा गोष्टींचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. म्हणून भाजपा महायुती सरकार आणि मनोज जरांगे यांचे संपूर्ण खानापूर आटपाडी तालुक्याच्या मराठा समाजाच्यावतीने आभार मानतो, असेही वैभव पाटील यांनी म्हटले आहे.
