इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जाहीर झालेल्या प्रभाग रचनेबाबत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे. नागरिकांनी या रचनेवर एकूण १५ हरकती दाखल केल्या आहेत. नगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग विभागणी करताना स्थानिक लोकसंख्या, भौगोलिक सोयी आणि आरक्षण पद्धती याबाबत सूक्ष्म विचार व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच विविध भागांतून आलेल्या हरकतींमध्ये सीमांकनातील त्रुटी, लोकसंख्येतील असमतोल आरक्षणाच्या गणिताबाबत सूचना नोंदवल्या गेल्या आहेत. अंतिम रचना निश्चित करण्यापूर्वी सर्वांना आपली मते मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
प्रभाग रचनेवर १५ हरकती दाखल
