भाजपला निवडून दिल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या पदरात काय पडले? असा सवाल करून सध्या भाजप चारशे पार असा नारा देत असले, तरी महाराष्ट्रामध्ये तसे चित्र नाही. देशात इंडिया आघाडीची लाट पसरली आहे. सत्ताधाऱ्यांकडुन संविधान संपविण्याचा घाट घातला जात आहे. भाजप हा देशासाठी मोठा धोका असल्याने अशा पक्षाच्या विरोधात आपण लढत आहोत, असे प्रतिपादन उद्धवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.विटा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख शिवसेना विटा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सांगता सभेत उद्धवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार विश्वजित कदम, नितीन बानुगडे-पाटील, चंद्रहार पाटील उपस्थित होते.