पोलीसांसमोर राडा;हॉटेल मालकासह तेराजणांवर गुन्हा

हातकणंगले, जिल्हा अधिकाऱ्यांनी बंदी आदेश लागू केलेला असताना बेकायदेशीर रित्या जमाव जमवून पोलीसांसमोरच मोठ मोठ्याने ओरडत तुफान राडा केला. याप्रकरणी बाबा हॉटेलच्या मालकांसह तेरा जणांच्या विरोधात हातकणंगले पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद हि घटना गुरुवारी रात्री साडे सहा वाजणेच्य सुमारास सांगली -कोल्हापूर मार्गावर माले फाट्या शेजारी असलेल्या बाबा हॉटेल समोर घडली. पोलीसांनी या प्रकरणी हरिष नबीसाब खतीब, टिपुसुलतान नबीसाब खतीब, महंम्मदहनीफ नबिसाब खतीब तिघे रा. हेरले ता. हातकणंगले)
अमोल राजेद्र माळी, प्रसाद नंदकुमार भोपळे, प्रथमेश तानाजी ननवरे, सोमनाथ बबन माळी, तानाजी आण्णासो ननवरे, पोपट भाऊसो सांगावे, रोहीत प्रकाश चौगुले, दर्शन अमित झावरे (सर्व रा. चोकाक ता. हातकणंगले), दत्तात्रय लक्ष्मण बुरुड, रमेश जयराम गिरी (दोघेही रा. बाबा हॉटेल हेरले), अशा तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.