गुजरातची टीएमटी स्टील बार उत्पादक कंपनी व्हीएमएस टीएमटी लिमिटेडचा आयपीओ १७ सप्टेंबर रोजी उघडणार आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १९ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येईल. VMS TMT Limited ipo ग्रे मार्केटमध्ये जोरदार कामगिरी करत आहे. त्यामुळे लिस्टिंग चांगले होण्याची अपेक्षा आहे.
किंमत पट्टा
VMS TMT Limited ipo साठी प्रति शेअर किंमत ९४ रुपये ते ९९ रुपये निश्चित केली आहे. तर लाॅट आकार १५० शेअर्सचा आहे. गुंतवणूकदारांना किमान १४८५० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हा एक मेनबोर्ड आयपीओ असून त्याचे लिस्टिंग बीएसई आणि एनएसईमध्ये होईल.
आयपीओचा आकार
व्हीएमएस टीएमटी लिमिटेडच्या आयपीओचा आकार १४८.५० कोटी रुपये आहे. आयपीओमध्ये फक्त नवीन शेअर्सची विक्री केली जाईल. यामध्ये १.५ कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील. म्हणजेच या आयपीओमधून जी काही रक्कम जमा होईल ती थेट कंपनीला जाईल. ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये शेअर्स विकले जाणार नाहीत.
जीएमपी किती
इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, कंपनीचा आयपीओ आज ग्रे मार्केटमध्ये १० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. आयपीओ उघडेपर्यंत जीएमपी वाढण्याचीही शक्यता आहे. या आयपीओसाठी अरिहंत कॅपिटल मार्केट्स लिमिटेडची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर कॅफिन टेक्नॉलॉजीजची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती केली आहे.
कंपनीचा नफा २०२४-२५ या आर्थिक वर्षात १४.५% वाढून १५.४ कोटी रुपये झाला. मात्र, या कालावधीत महसूल ११.८% ने घटून ७७०.२ कोटी रुपये झाला. कंपनीने २७ मार्च रोजी आपला मसुदा कागदपत्र दाखल केला, ज्याला २१ जुलै रोजी सेबीकडून मंजुरी मिळाली.
