आशिया कप 2025 स्पर्धा रंगतदार स्थितीत पोहचली आहे. या स्पर्धेत साखळी फेरीचा थरार पाहायला मिळतोय. सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी संघांमध्ये चढाओढ आहे. या स्पर्धेतील नववा सामना बी ग्रुपमधील 2 संघांमध्ये होणार आहे. बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान एकमेकांविरुद्ध असणार आहेत. अफगाणिस्तानने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केलीय. तर बांगलादेशने आपल्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. मात्र दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे बांगलादेशसाठी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात करो या मरो अशी स्थिती आहे. तर अफगाणिस्तानकडे सलग दुसरा सामना जिंकून सुपर 4 साठी दावा आणखी मजबूत करण्याची संधी आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना मंगळवारी 16 सप्टेंबरला होणार आहे. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
बांगलादेशचा हा साखळी फेरीतील तिसरा तर अफगाणिस्तानचा दुसरा सामना असणार आहे. अफगाणिस्तानने 9 सप्टेंबरला हाँगकाँगला 94 धावांनी पराभूत करत या स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशनेही हाँगकाँगवर 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. अशाप्रकारे अफगाणिस्तान आणि बांगलादेशने विजयी सलामी दिली. मात्र श्रीलंकेने 13 सप्टेंबरला बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे बांगलादेशला या स्पर्धेत आव्हान कायम राखायचं असेल तर अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवण्याशिवाय पर्याय नाही. राशीद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर लिटन दास याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.
त्यामुळे आता अफगाणिस्तान मंगळवारी सलग दुसरा विजय मिळवून सुपर 4 साठी दावा मजबूत करणार की बांगलादेश कमबॅक करत आव्हान कायम ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
