सांगोला येथे सोमवारी तालुकास्तरीय निमंत्रित कवींचे संमेलन

महाराष्ट्र साहित्य परिषद , पुणे शाखा सांगोला , नगर वाचन मंदिर सांगोला , लायन्स व क्लब सांगोला, रोटरी क्लब सांगोला व अर्बन को-ऑप . बँक सांगोला यांच्या सांगोला संयुक्त विद्यामाने सोमवार , दि २ जून रोजी सायंकाळी ५ . ०० वा . सांगोला येथील अर्बन को-ऑप . बँक सभागृह येथे सांगोला तालुक्यातील निमंत्रित कवी / कवयत्री यांचे कविसंमेलन होणार आहे.

कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी रं . ता . चोरमुले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . अविनाश सांगोलेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच या कवीसंमेलनामध्ये शिवाजी बंडगर , राधिका प्रेमसंस्कार , तानाजी वाघमारे , साबळे गुरुजी , ना . मा. कांबळे , संतोष जगताप , अँड उदय दौन्डे , दमयंती कुलकर्णी , पुष्पलता मिसाळ , सुशिला नांगरे – पाटील , योजना मोहिते , मनीषा ठोंबरे , हर्षदा गुळमिरे , सुवर्णा तेली , अनिल केंगार यांच्यासह अनेक निमंत्रित कवी / कावयत्रि कविता सादर करणार आहेत. तरी काव्यानंदासाठी रसिक श्रोते यांनी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागतोत्सुक म . सा . प . , प्रा . प्रबुध्दचंद्र झपके , डॉ . प्रभाकर माळी , उन्मेष आटपाडीकर , विकास देशपांडे , प्रा . धनजी चव्हाण यांनी केले.